पुणे : ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू याचं वयाच्या 92 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानं कलाक्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातूनही हळहळ व्यक्त होतेय.
डॉ. लागूंचा मोठा प्रभाव कलाक्षेत्रावर आहे. जुन्याजाणत्यांपासून ते होतकरू कलावंतापर्यंत सर्वांना त्यांचा आधार वाटायचा. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र एका प्रतिभासंपन्न अभिनेत्याला पारखा झाला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.
वैचारिक भान असलेले प्रयोगशील रंगकर्मी म्हणून डॉ. लागूंचा मोठा प्रभाव कलाक्षेत्रावर आहे. जुन्याजाणत्यांपासून ते होतकरू कलावंतापर्यंत सर्वांना त्यांचा आधार वाटायचा. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र एका प्रतिभासंपन्न अभिनेत्याला पारखा झाला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/2KjzKkia80
— Sharad Pawar (@PawarSpeaks) December 17, 2019
ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांच्या निधनाने मराठी नाट्यसृष्टीचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे.
ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांच्या निधनाने मराठी नाट्यसृष्टीचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. पिंजरा, सामना यांसारखे चित्रपट आणि नटसम्राट, हिमालयाची सावली यांसारख्या अजरामर नाटकांमधून त्यांनी मराठी चित्रपट-नाट्यसृष्टी जीवंत केली. माझी डॉ लागू यांना विनम्र श्रद्धांजली.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) December 17, 2019
दरम्यान, पुण्यातील दिनानाथ रुग्णालयात डॉ. लागू यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्यापश्च्यात त्यांच्या पत्नी दीपा लागू आहेत.
गेली अनेक दशके सिनेमा, नाट्य क्षेत्राच्या माध्यमातून मराठी आणि हिंदी रसिकजनांवर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे आपल्यातून निघून जाणे अतिशय दुःखद आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 17, 2019
ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीराम लागू यांचे निधन झाले. पुरोगामी चळवळीबद्दलची बांधिलकी त्यांनी आयुष्यभर जपली. रंगभूमी,चित्रपट या क्षेत्रात त्यांचे अतुलनिय योगदान आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
— Supriya Sule (@supriya_sule) December 17, 2019
नटसम्राटांच्या जाण्याने आज कदाचित मृत्यूही ओशाळला असेल. पण चाहत्यांच्या मनातील सिंहासनावर ते कायम आरूढ राहतील.
ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली.#श्रीरामलागू #ShriramLagoo pic.twitter.com/qL7YbzVN4O— Ashok Chavan (@AshokChavanINC) December 17, 2019
महत्वाच्या घडामोडी-
-ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू याचं निधन
-भाजपनं उगाच इथं बोंबलू नये, केंद्राकडे जाऊन पैसै मागावे – उद्धव ठाकरे
-हे सरकार जेढवे दिवस सत्तेत राहील तेवढे दिवस वाट लावेल- चंद्रकांत पाटील
-माझी लढाई शरद पवारांसोबत होती- पंकजा मुंडे