ही तुम्हाला असहिष्णुता वाटत नाही का? आशिष शेलारांचा शरद पवारांना सवाल

0
273

मुबंई : वडाळा येथे शिवसैनिकांनी एकाचे मुंडण केले होते. याकडे लक्ष वेधत आता तुम्हाला ही असहिष्णुता वाटत नाही का, असा सवाल करत भाजपचे नेते आशीष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात समाजमाध्यमांवर संदेश लिहिणाऱ्या व्यक्तीचे मुंडण करून बेदम मारहाण करण्यात आली. महिला विरोधात बोलली तर तिलाही अपमानित करण्यात आलं. ही तुम्हाला असहिष्णुता वाटत नाही का , असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या अमृता देवेंद्र फडणवीस यांच्यावर समाजमाध्यमांवर झालेली अपमानास्पद विधाने आणि वडाळा येथील एकाचे शिवसैनिकांनी केलेले मुंडण या दोन घटनांवरून आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, या राज्यात हिंदू सुरक्षित आहेत का, हिंदू  महिलांसोबत असंच अपमानास्पद वागवणार का, असा सवाल शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

-स्मार्टफोन कंपनी Apple ‘हा’ APP प्ले स्टोअरमधून हटवला

-“जनतेला गृहीत धरंल की, वेगळं काय घडणार”

-‘या’ दिवशी होणार महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार!

-राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता म्हणतो… आमच्यासाठी अजित पवार हेच मुख्यमंत्री!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here