मुंबई : महापालिकेच्या केईएम रुग्णालयात मृतदेह काही दिवस पडून आहेत असे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले होते तर शीव रुग्णालयात एका मृतदेहाशेजारच्या खाटेवर दुसरा रुग्ण असून परिचारिका तशाच परिस्थितीत रुग्णावर उपचार करत असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. हा व्हिडिओ प्रसिद्ध होताच भाजपाच्या काही नेत्यांनी जोरदार टीका केली. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
पालिकेच्या शीव रुग्णालयात करोनाच्या रुग्णाच्या मृतदेहांचे घाणेरडे राजकारण विरोधी पक्षाचे काही लोक करू पाहात आहेत. करोनाच्या मृतांचे राजकारण करून मृतांना व उपचार करणाऱ्या डॉक्टरांना अपमानित करू नका, असं राजेश टोपे म्हणाले.
रुग्णाला औषध देणे तसेच धीर देण्याचे काम एखादी परिचारिका व डॉक्टर करत असले तर ‘मृतदेहाशेजारी रुग्णावर उपचार’ अशा प्रकारचा व्हिडिओ काढणे हा गंभीर गुन्हा तर आहेच पण त्याच्या आधारे जर विरोधक टीका करणार असतील तर ते त्याहून गंभीर गुन्हेगार आहेत, असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
…त्यामुळे राज्यातील तरुणांनाही रोजगार मिळेल; राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
राज्याच्या इतिहासात प्रथमच असा विरोधी पक्ष आहे, जो महाराष्ट्राची बाजूच घेत नाही- संजय राऊत
फडणवीसजी, नाक घासून माफी मागा, नाहीतर…; राष्ट्रवादी काँग्रेसचा फडणवीसांवर निशाणा
कोणत्याही ठाकरेंबद्दल माझ्या मनात आकस नाही- नारायण राणे