पुणे : पुणे पदवीधर मतदार संघातील मनसेच्या उमेदवार रूपाली पाटील ठोंबरे यांना आज जिवे मारण्याच्या धमकीचा फोन आला. याबाबत रूपाली पाटील ठोंबरे यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून संबंधित व्यक्तीविरूद्ध पोलिस कारवाईस सुरूवात झाली आहे.
पुणे पदवीधर मतदार संघात प्रचार करत असताना रूपाली पाटील ठोंबरे यांच्या मोबाईलवर फोन आला. त्यावेळी बोलणाऱ्या व्यक्तीने पाटील यांचा एकेरी उल्लेख केला. आमदार व्हायचे स्वप्न बघू नका, असेल तेथे येऊन संपवून टाकेन, अशी धमकी दिली. त्यानंतर पाटील यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच संबंधित आरोपीचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी पाटील यांनी केली.
दरम्यान, पाटील यांच्या मोबाईलमध्ये हा काॅल रेकाॅर्ड झाला असून त्याची काॅपी, तसेच संबंधित मोबाईल नंबर त्यांनी पोलिसांना दिला आहे. तसेच मनसेच्या पुण्यातील कार्यकर्त्यांनीही याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
धक्कादायक! मुंबईत अवघ्या 3 वर्षाच्या चिमुरडीवर 2 अल्पवयीन मुलांकडून सामुहिक बलात्कार
भाजपने ठरवलं तर महिला मुख्यमंत्री करायला वेळ लागणार नाही- चंद्रकांत पाटील
‘ही’ गोष्ट शिवसेनेच्या मुर्ख कार्यकर्त्यांना कधी समजणार?; ‘या’ काँग्रेस नेत्याची टीका