Home महाराष्ट्र “ओबीसी समाजाला डिवचण्याचा प्रयत्न करु नका, त्यांच्या हक्काचा एक कणही कमी होऊ...

“ओबीसी समाजाला डिवचण्याचा प्रयत्न करु नका, त्यांच्या हक्काचा एक कणही कमी होऊ देणार नाही”

मुंबई : ओबीसी समाजाला त्यांच्या न्याय्य आणि हक्काचं जे आहे ते देऊ. त्यांच्या हक्काचं जे असेल त्यातील एक कणही कमी होऊ देणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं. सोमवारपासून 2 दिवसीय हिवाळी अधिवेशनास सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुंबईत पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यात ते बोलत होते.

मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाला धक्का लावू नये, अशी मागणी ओबीसी समाजाकडून होत आहे. या बाबत उद्धव ठाकरेंना विचारले असता, त्यांनी “राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यासाठी आमची वकिलांशी चर्चा सुरु आहे.,असं म्हटलं.

दरम्यान, तसेच ओबीसी प्रवर्गातील समाजामध्ये गैरसमज पसरवू नये. त्यांच्या हक्काचंं जे आहे, त्यातील एक कणही आम्ही कमी होऊ देणार नाही. त्यांच्या हक्काचं काहीच जाऊ देणार नाही, असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी-

“भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना कोरोनाची लागण”

ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरू; देवेंद्र फडणवीसांचा सरकारला इशारा

नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचा असेल- संजय राऊत

औरंगाबादचा विकास वेगाने होणार, मला विकास कामे करण्याची घाई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे