Home महाराष्ट्र सगळं उघडलं म्हणजे कोरोना गेला असं समजू नका- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सगळं उघडलं म्हणजे कोरोना गेला असं समजू नका- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : सगळ उघडलं म्हणजे कोरोना गेला असं समजू नका, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

आपण सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं उघडली आहेत. 4 दिवसांवर कार्तिकी वारी येत आहे. कार्तिकीची वारी साधेपणाने पार पाडा. गर्दी न करता सण-उत्सव साजरे करा, असं आवाहनही उद्धव ठाकरेेंनी केलं आहे.

कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाही, तरुणांनो सावध राहा. तसेच येणारी लाट आधीच्या लाटेपेक्षा अधिक उग्र असू शकते., असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, सावध राहा यानंतर येणारी कोरोनाची लाट नसून त्सुनामी असण्याची शक्यता आहे, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

माझे लाईट बिल, माझी जबाबदारी, सोमवारी भेटूच…शॉकसाठी तयार राहा; मनसेचा सरकारला इशारा

पदवीधर निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील सरकार बदलणार- प्रविण दरेकर

तू तुझा प्रचार जोरात कर, बाकी मी बघतो; राज ठाकरेंचा रूपाली पाटील ठोंबरेंना मेसेज

राज्य सरकार घोषणा करतं आणि पलटतं, त्यांची भूमिका लोकविरोधी- देवेंद्र फडणवीस