आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शनिवारी सभेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
बाबरी पडली तेव्हा अयोध्येत शिवसैनिक नव्हते, मी तेथे गेलो होतो, असं फडणवीस म्हणतात. अरे त्यावेळी तुमचं वय काय होतं? तेव्हा अयोध्येला शाळेची किंवा कॉलेजची सहल गेली होती का? तुम्ही आमच्यावर शंका घेता. मग मी देखील देवेंद्र फडणवीसांना एक सवाल विचारतो, तुम्ही देशासाठी सोडा, हिंदुत्वासाठी काय केलं, हे सांगा. भाजपने बाबरी पाडलीच नाही. पण देवेंद्र फडणवीस, तुम्ही त्याठिकाणी असतात आणि बाबरी मशिदीवर नुसता चढायचा प्रयत्न केला असतात तर तुमच्या वजनानेच बाबरी मशीद खाली आली असती., असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला होता. यावरून आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला भाजप कार्यकर्त्यांची मारहाण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमची तुम्हाला एकच विनंती आहे, तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या शरीराविषयी त्यांच्या वजनावर काही बोलू नका. टीका करू नका. तुम्ही कधी आरशात स्वत: चा चेहरा पाहावा मग विचार करावा. तसेच जास्त बढाया मारु नका, अंगाशी येईल., असा इशारा नारायण राणेंनी यावेळी दिला. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान, मी आधी शिवसेनेत होतो, आता भाजपमध्ये आहे, त्यामुळे बोलायला मागेपुढे बघणार नाही, त्यामुळे पुढच्या वेळी अजून समोरचं बोलेल, असा इशाराही नारायण राणेंनी यावेळी दिला.
महत्वाच्या घडामोडी –
सच हमेशा कडवा होता है; मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला
हलक्या वजनाने काल आणखी ‘हलकं’ केलं; अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्ष टोला
“वसंत मोरेंची नाराजी दूर होणार?; राज ठाकरेंनी फोन करून उद्या भेटीसाठी बोलावलं”