हा व्हिडियो आहे एका लग्नातला. या लग्नामध्ये मित्रांनी नवरदेवाला दिलेले हे गि’फ्ट्स पाहून तुम्हीही हसू आवरणार नाही
रिसेप्शनमध्ये नवऱ्याचे जिगरी आणि खट्याळ दोस्तांनी काय अतरंगीपणा केला आहे ते पहा.
पहिला मित्र हातात खेळण्यातला बॉल घेऊन येतो. त्याचा बॉल हवेत उडवत नवरदेव पुढच्या मित्राकडे वळतो. तर हा दुसऱ्या मित्राने आपल्या मित्रासाठी लहान मुलांची चुपणी आणलेली असते. नवरदेव त्याची ही भेट उडवून लावतो. आता तिसरा मित्र लहान मुलांची दुधाची बाटली अनतो. या सगळ्यांत बाजूला उभ्या असलेली नववधु मात्र लाजून लाजून चुर झाली. पण ही तर सुरुवात.
तुम्ही हे वाचलात का?
“बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची मशाल विझली, आता त्याचा धूर दिसतोय”; प्रवीण दरेकरांची शिवसेनेवर टीका
पुढे पुढे जे मित्र येतात ते काही ना काही अशीच भेटवस्तू आणतात, ज्यामुळे नवरदेवाची मस्करी व्हावी. त्यात लहान मुलांची खेळणी असतात, एक जण लहान मुलांचे कपडे आणतो, एक जण लहान मुलांचे बूट पण आणतो. शेवटचा तर कहर करतो. थेट बाहुलीच आणतो. काय बोलणार या अतरंगी मित्रांना. नवऱ्याची अवस्था पण काही वेगळी नसते.
महत्वाच्या घडामोडी –
ज्याचं आयुष्यचं लुबाडणूकीत गेलं त्यांनी अनिल परबना शहाणपणा शिकवण्याची गरज नाही- विनायक राऊत
इथं माणसं मरत आहेत, तुम्ही मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय करताय?- नारायण राणे