सातारा : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ते सातारामध्ये अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्या उद्घाटन सोहळ्यावेळी बोलत होते.
मराठा आरक्षणावरुन होणारं राजकारण थांबायला हवं. लोकप्रतिनिधींनी याचा विचार करायला हवा. नरेंद्र पाटलांनी आज अण्णासाहेब फाऊंडेशनची स्थापना केली. त्यांनी त्यांचं आयुष्य मराठा समाजासाठी अर्पण केलं आहे. आपल्याकडे पुढची पिढी आशेनं पाहत आहे, असं उदयनराजे भोसले म्हणाले.
दरम्यान, मला नेत्यांना एकच सांगायचं आहे. लोकांचा अंत पाहू नका, एकदा जर उद्रेक झाला तर त्याला कोण थांबवणार?, हा उद्रेक एक ना एक दिवस नक्की होईल, असंही उदयनराजे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
“देवेंद्रजी, तुम्हाला लवकरच संधी मिळेल”
“BREAKING NEWS! राज ठाकरे यांना बेलापूर कोर्टाकडून वाॅरंट”
भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर झालेल्या चुकीच्या उल्लेखावर रक्षा खडसेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…
“तुम्हाला खरंच महिला सन्मानाचा इतका कळवळा असता, तर…”