Home देश आरोपांकडे लक्ष देऊ नका, कामावर भर द्या; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना धीर

आरोपांकडे लक्ष देऊ नका, कामावर भर द्या; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना धीर

नवी दिल्ली : एकीकडे राज्यातील कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सतत मोठी भर पडत आहे. तर दुसरीकडे राज्यात कोरोनावरील लसींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकार आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धीर दिला आहे.

तुम्ही आरोपांकडे लक्ष देऊ नका, तुमच्या कामावर भर द्या, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरे यांना धीर दिला आहे. नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी काल व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी राज्यातील कोरोना स्थितीचा पंतप्रधानांनी आढावा घेतला.

राज्यात कोरोनावरून राजकारण करू नये म्हणून सर्व पक्षांना समजवा. कोरोना महामारीत राजकारण आणू नका म्हणून या लोकांना सांगा, असं उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना सांगितलं. तसेच राज्यात मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग वाढवण्यात येत आहेत. ही टेस्टिंग अजून वाढवण्यात येत आहे. मात्र, केंद्राकडूनही आम्हांला सुविधा देण्यात याव्यात. राज्याला ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्ससाठी मदत करा, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली.

दरम्यान, यावेळी मोदींनी उद्धव ठाकरे यांना आरोपांकडे लक्ष देऊ नका, तुमच्या कामावर लक्ष द्या, असा सल्ला दिला. कोरोना रुग्णांची संख्या वाढली तरी तुम्ही चिंता करू नका. रुग्णांची संख्या वाढल्याने आपली कामगिरी खराब होतेय, असा समज करून घेऊ नका. मी आताही तुम्हाला टेस्टिंग वाढवण्यावर भर देण्याचा सल्ला देईन. तुम्ही टेस्टिंग वाढवली तर तुमची रुग्ण संख्या वाढताना दिसणारच, अशा शब्दात मोदींनी उद्धव ठाकरेंना आश्वस्त केलं.

महत्वाच्या घडामोडी –

“निदान भाजपच्या 105 आमदारांच्या मतदारसंघातील लोकांसाठी तरी लस द्या”

“ज्यांचं तोंड फाटलेलं आहे त्यांना मला उत्तर देण्याची गरज नाही”

मुख्यमंत्री ‘मातोश्री’मधून बाहेर पडत नाही, ते कोरोना रुग्णांना कसं सांभाळणार?; नारायण राणेंचा सवाल

मोठी बातमी! 11 एप्रिल रोजी होणारी MPSC ची परीक्षा पुढे ढकलली!