आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला मोठा झटका दिलाय. कारण जाहीर झालेल्या निवडणुका स्थगित करायला कोर्टानं नकार दिलाय. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आताची निवडणूक प्रक्रिया चुकीची आहे. ओबीसी आरक्षणासहीत ही निवडणूक घेतली होती. आता ही निवडणूक ओबीसी आरक्षणासहीत होत नसेल तर ही निवडणूक प्रक्रिया रिपीट करा. इम्पिरिकल डेटा येत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, अशी मागणी केली आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार आशिष शेलार यांनी आज निवडणूक आयोगाची भेट घेऊन निवेदन सादर केलं. त्यानंतर मीडियाशी बोलताना पंकजा मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या मागणीची माहिती दिली.
हे ही वाचा : “…तर झोपा आणि बलात्काराचा आनंद घ्या; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान”
मी आयोगाला विनंती केली की, निवडणूक प्रक्रिया चुकीची आहे. ओबीसी आरक्षणासहीत ही निवडणूक घेतली होती. आता ही निवडणूक प्रक्रिया ओबीसी आरक्षणासहित नसेल तर ही निवडणूक प्रक्रिया रिपीट करा. जोपर्यंत इम्पिरिकल डेटा येत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, अशी विनंती निवडणूक आयोगाला केल्याचं पंकजा यांनी सांगितलं. तसेच मी पर्याय दिला नाही. सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान करायचा असेल, इम्पिरिकल डेटा गोळा होईपर्यंत या निवडणुका घ्यायच्याच असेल तर मग एससी, एसटीच्या जागा वगळता ही निवडणूक ओपन टू ऑल करायला पाहिजे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
आम्ही निवडणूक आयोगाला भेट दिली. इम्पिरिकल डेटा कुणी करायचा यावर ओबीसी आरक्षणाचं भिजत घोंगडं होतं. आता राज्य सरकारनेच हा डेटा गोळा करायचा आहे हे कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं आहे. सरकारने वेळ घालवल्याने ओबीसींचं नुकसान झालं आहे. हे आरक्षण गेलं आहे. आता इम्पिरिकल डेटा तयार झाल्यावर आणि आरक्षणाचा निर्णय घेतल्यावर या निवडणुका घेतल्या जाव्यात असं कोर्टाचं म्हणणं आहे. त्याचा आम्ही सन्मान करतो, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
मनसेत पक्षप्रवेशाचं वादळ; घाटकोपर येथील असंख्य तरूणांनी हाती धरला मनसेचा झेंडा
“महाविकास आघाडी घाबरली, नवी मुंबईत महापाैर भाजपचाच होणार”
“मनसेतून राष्ट्रवादीत आलेल्या रूपाली पाटील यांनी हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना केलं अभिवादन”