मुंबई : संचारबंदीसारखे निर्णय राज्य सरकारनं जनतेच्या हितासाठीच घेतले आहेत. ह्यात कुणाचा वैयक्तिक स्वार्थ असण्याचं काही कारण नाही. आणखी कठोर पावलं उचलायला भाग पाडू नका, आणखी कठोर पावलं उचलायला भाग पाडू नका. कृपया सर्वांनी आपल्या घरीच रहा, अशी विनंती अजित पवार यांनी केली आहे,
मास्क किंवा औषधांची अवैध साठेबाजी करणाऱ्या असामाजिक घटकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही अजित पवारांनी दिला आहे.
संचारबंदीसारखे निर्णय राज्य सरकारनं जनतेच्या हितासाठीच घेतले आहेत. ह्यात कुणाचा वैयक्तिक स्वार्थ असण्याचं काही कारण नाही.आणखी कठोर पावलं उचलायला भाग पाडू नका,कृपया घरीच रहा,अशी विनंती करतो.मास्क किंवा औषधांची अवैध साठेबाजी करणाऱ्या असामाजिक घटकांवर कठोर कारवाई केली जाईल.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 24, 2020
दरम्यान, सोमवारी राज्य सरकारनं राज्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. तसंच मध्यरात्री ही संचारबंदी लागूही झाली होती. त्यानंतरही मंगळवारी सकाळी नागरिकांनी रस्त्यांवर तसंच भाजी मंडईमध्ये गर्दी केल्याचं चित्र पहायला मिळालं होतं. त्यावर अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा आता 97 वर ; सांगलीत 4 तर मुंबईत 3 नवीन रुग्ण
“टाळया किंवा थाळया वाजवून हा करोना विषाणू जाणार नाही”
महाराष्ट्रात आजपासून संचारबंदी; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
…तर राज्यात संचारबंदीही लागू केली जाईल- अजित पवार