मुंबई : पुढील वर्षभर तरी ‘ठाकरे सरकार’वर अविश्वास दाखवण्याच्या भानगडीत फडणवीस यांनी पडू नये, असा सल्ला शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपला दिला आहे.
‘सत्यमेव जयते’ आणि ‘प्राण जाय पर वचन न जाय’ हे सगळ्यात मोठे संतवचन. हे संतवचन भाजपने पाळले असते तर विरोधी पक्षात बसून ‘मळमळ’ ओकण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती, असा टोलाही सामनातून लगवण्यात आला.
विरोधी पक्षनेते फडणवीस हे सभागृहात नको तितक्या तावातावाने बोलतात, पण त्यांचं बोलणं बेताल आहे यावर महाराष्ट्राच्या जनतेचे एकमत झालं आहे. एकीकडे संत तुकारामांचा गजर करायचा आणि त्याच वेळी वर्तणूक ‘मंबाजी’सारखी करायची. विरोधी पक्षानं एकदा काय ते ठरवायला हव, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, 105 आमदार निवडून येऊनही भाजपला सत्तेवर येता आलं नाही. ही एक पोटातली मळमळ विरोधी पक्षनेते आणि त्यांचे सहकारी विधानसभेत व्यक्त करत आहेत. मळमळीकडे दुर्लक्ष केलेलं बरं, असं म्हणत शिवसेनेनं सामनातून भाजपला कानपिचक्या लगावल्या आहेत.
महत्वाच्या घडामोडी-
-भाजपाचे नेते कोणी आपल्याकडे बघत नाही ना, याची खात्री करून माझ्यासोबत हात मिळवणी करतात
-ट्रेलर रिलीजनंतर छपाकची खरी ‘हिरो’ असणारी लक्ष्मी अग्रवाल नाराज
-महाराष्ट्र आपल्या आक्रमकतेला साथ देईल असं जर भाजपला वाटत असेल तर भाजप मूर्ख- जितेंद्र आव्हाड
-IPL लिलाव 2020मध्ये सर्वात महागडा ‘हा’ खेळाडू ठरला