आमच्या गृहमंत्र्यांना फडतूस म्हणू नका, अन्यथा…; भाजप नेत्याचा उध्दव ठाकरेंना इशारा

0
211

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जालना : ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. आता भाजप नेत्यांकडून उध्दव ठाकरेंवर पलटवार केला आहे.

माजी मंत्री भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे तुमची भ्रष्ट आणि निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून नोंद झालेली आहे, त्यामुळे तुम्ही आमच्या गृहमंत्र्यांना फडतूस म्हणू नका, अन्यथा राज्यातील 12 कोटी जनता तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही, असं बबनराव लोणीकर म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा : …तर 48 तासांमध्ये मातोश्रीवर येऊन दाखवाच; सुषमा अंधारेंचं, बावनकुळेंना ओपन चॅलेंज

कोरोना काळात लोक मृत्युमुखी पडत असतांना तुम्ही घरात बसले होते. त्यामुळे तुमची घरकोंबडा अशी प्रतिमा महाराष्ट्रात निर्माण झाली होती. या काळातील भ्रष्टाचार आणि मुख्यमंत्री म्हणून निष्क्रियतेचा ठपका तुमच्यावर आहे. त्यामुळे आमच्या नेत्याबद्दल, गृहमंत्र्यांबद्दल बोलतांना जरा तोंड सांभाळून बोला. तुमच्या तोंडून अशी भाषा शोभत नाही, असं बबनराव लोणीकर यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी 

…त्यामुळे उद्धव ठाकरे तुरूंगात जाणार?; नारायण राणेंचं मोठं विधान ‌

“राष्ट्रवादीची मोठी खेळी; शिवेंद्रराजेंना टक्कर देण्यासाठी भाजपचा ‘हा’ नेता हाती बांधणार घड्याळ”

भाजप आणि शिंदे गटात नाट्यनाराजी; ‘या’ भाजप खासदाराने जाहीरपणे व्यक्त केली खंत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here