मुंबई : राज्यात गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाने जोरदार तडाखा लावलेला आहे. राज्यातील अनेक भागात पूर आला असून अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी महाडमधील तळीये गावात जाऊन या भागाची पाहणी केली. यावरुन भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.
“मुख्यमंत्र्यांनी दोन तासाचा का होईना दौरा काढला हे चांगलं केलं, पण मागील अनुभवाप्रमाणे कोकणवासीयांची बिस्कीट व मेणबत्त्यावर बोळवण करू नका. यावेळी मनापासून मदत करा, आणि खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचेल याचीही काळजी घ्या. या संकटात विरोधीपक्ष म्हणून सोबत आहोत, असं केशव उपाध्ये म्हणाले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुर्घटनाग्रस्त तळीये गावाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन करत, ‘तुम्ही दुःखातून सावरा, बाकीची काळजी आम्ही घेऊ’ अशी ग्वाही दिली. तसेच, डोंगर उतारावरील सर्व वस्त्यांचे पुनर्वसन केले जाणार असून आवश्यक ती सर्व मदत केली जाणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
ठोस निर्णय घ्या लोकांना मदत मिळू दे. गेल्या दोन संकटात सरकारने पूर्ण निराशा केली आहे.
कोकण वर आलेले संकट खुप मोठे आहे. त्यांना तातडीने मदतीची गरज आहे. कोकणाला गेल्या दीड वर्षांत निसर्गाने भयानक फटके दिले. आधी निसर्ग वादळाने सारे काही जमीनदोस्त केले, मग 2/4— Keshav Upadhye (@keshavupadhye) July 24, 2021
महत्वाच्या घडामोडी –
स्वतःचं पद वाचवण्यासाठी मुख्यमंत्री घरी काळी जादू करत असतात, तशीच…- नितेश राणे
तळीये गावाच्या पुनर्वसनाची जबाबदारी ‘म्हाडा’ने स्वीकारली; जितेंद्र आव्हाडांची घोषणा
“सांगली, कोल्हापूरातील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पाऊले टाकण्याची गरज”
मुख्यमंत्र्यांचा महाड दाैरा म्हणजे वराती मागून घोडे; प्रवीण दरेकरांचा घणाघात