Home महाराष्ट्र घाबरु नका, कोरोना संपल्यावर आपलीच सत्ता येईल; रावसाहेब दानवे पाटलांचं वक्तव्य

घाबरु नका, कोरोना संपल्यावर आपलीच सत्ता येईल; रावसाहेब दानवे पाटलांचं वक्तव्य

मुंबई : एकनाथ खडसे यांच्यावर भाजपमध्ये खरंच अन्याय झाला आहे. त्यामुळे त्यांनी भाजप सोडून आता शिवसेनेत यायला हवं. आम्ही त्यांचे स्वागत करु, असं वक्तव्य शिवसेना नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं होतं. त्यावर भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

घाबरु नका, कोरोना संपल्यावर आपलीच सत्ता येईल. आणि अब्दुल सत्तार मला भेटायला भोकरदनला येतील आणि बोलतील फडणवीसांना भेटायला जाऊया, असा टोला रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तारांना लगावला आहे.

अब्दुल सत्तार शिवसेनेत राहतील याची गॅरेंटी कुठे आहे? पहिला अपक्ष, मग काँग्रेस आणि आता शिवसेनेत, असं रावसाहेब दानवे यांनी म्हणत अब्दुल सत्तारांवर निशाणा लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

कोरोनाविरोधात एकत्र येऊया; चंद्रकांत पाटलांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

पुण्यातील लॉकडाऊन व्यापाऱ्यांच्या दबावामुळे हटवला- अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस मध्ये विलीन करून शरद पवार यांना काँग्रेस अध्यक्ष करा- रामदास आठवले

कंगना रणौतसोबत माझं काही व्यक्तीगत भांडण नाही, पण…-संजय राऊत