उस्मानाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक सरकारी यंत्रणा कोरोना नियंत्रण आणि जनजागृतीवर मोठा भर देताना दिसत आहेत. जनजागृतीसाठी काही नगरपालिकांनी भन्नाट कल्पना राबवून लोकांपर्यंत संदेश दिला आहे. असंच एक उदाहरण उस्मानाबादमध्ये पाहायला मिळत आहे.
कोरोना संसर्गाची पर्वा न करता घराबाहेर पडणाऱ्या अतिशाहण्यांना नगरपालिकेने एका अनोख्या पोस्टरमधून घरातच थांबण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी थेट बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन यांनाही कोरोना झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, उस्मानाबादमधील लोहारा नगरपालिकेने अमिताभ बच्चन यांचा प्रसिद्ध चित्रपट ‘डॉन’चा लोकप्रिय डायलॉग वापरुन हे पोस्टर तयार केलं आहे. या पोस्टरवर लिहिलं आहे, ज्या डॉनला पकडणे मुश्कीलच नाही तर नामुमकीन होते, त्याच डॉनला कोरोनानं पकडलंय. आपणही आपल्या परिवारासाठी घरीच थांबा. उगाच डॉन बनू नका. सोबतच कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी याच्या सूचनाही या पोस्टरवर लिहिण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या घडामोडी-
“युजीसी विरोधात आदित्य ठाकरेंनी घेतली सुप्रीम कोर्टात धाव”
“…यामुळे फडणवीसांना महाराष्ट्रात कटोरा घेऊन फिरावं लागेल
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाउन वाढवण्यासाठी अनुकूल?”
अखेर ठरलं! पंकजा मुंडेंची दिल्ली वारी पक्की; सोबतच ‘या’ नेत्यांनाही दिल्लीत संधी