Home महाराष्ट्र महाराष्ट्रात आता शिवसेनेला कुत्रंही भीक घालणार नाही; निलेश राणेंचा घणाघात

महाराष्ट्रात आता शिवसेनेला कुत्रंही भीक घालणार नाही; निलेश राणेंचा घणाघात

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत मोदींवर निशाणा साधला होता. यावरून आता भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : ईडीच्या रडारवरील नारायण राणे भाजपमध्ये गेले मग, ते पवित्र झाले का?; शिवसेनेचा सवाल

संज्या किती जरी शेती कायद्यांचा विषय घेऊन नाचलास तरी महाराष्ट्रात शिवसेनेला आता कुत्र भिक घालणार नाही. देशाच्या स्वातंत्र्या वर असा बोलतो जसं ह्याच्यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळालं, सत्तेचा गैरवापर करून एका महिलेला छळणारा देशाच्या पंतप्रधानांवर बोलतो ह्या पेक्षा दुर्भाग्य काय? असा घणाघात निलेश राणेंनी यावेळी केला.

दरम्यान, शेतकरी खलिस्तानवादी अतिरेकी होते तर मग पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्यापुढे पांढरे निशाण का फडकविले ? तिन्ही कृषी कायदे मागे घेणे अखेर केंद्र सरकारला भाग पडलं आहे. शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय झालाच आहे. मागे हटणार नाही असं सांगणाऱ्यांचा अहंकार पराभूत झाला; पण आताही अंधभक्त बोलतील, ‘काय हा साहेबांचा मास्टर स्ट्रोक!, अशी टीका संजय राऊतांनी केली होती.

महत्वाच्या घडामोडी –

100 कोटींच्या आरोपांवर शिवसेना नेते अर्जुन खोतकरांचं किरीट सोमय्यांना आवाहन, म्हणाले…

“मी मरेन तर महाराष्ट्रासाठी आणि मी जगेन तर महाराष्ट्रासाठीच; राज ठाकरेंकडून प्रबोधनकारांना श्रद्धांजली अर्पण”

महाराष्ट्रालाही 2 वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळालं, आम्ही करेक्ट कार्यक्रम करून दाखवला; संजय राऊतांची टोलेबाजी