नागपूर : OBC समाजाने रस्त्यावर भीक मागत फिरायचं का?, असा सवाल मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी केला आहे. टीव्ही 9 मराठीला त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यावेळी ते बोलत होते.
मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेवून इतर नोकरभरती सुरू करा. ओबीसींसह इतर मुलांचं वय वाढत. चाललंय, त्यांना वेठीस धरायला नको, मराठा समाजावर अन्याय नको, पण ओबीसींवरही अन्याय नको., असं विजय वडेट्टीवार म्हणाले
नोकरीभरतीसाठी ओबीसी समाज रस्त्यावर उतरला तर ते योग्यच आहे. नोकर भरतीसाठी ओबीसी तरुणांमध्ये असंतोष वाढतोय. कालच्या कॅबिनेटमध्ये इतर नोकरभरती सुरू करण्याची मागणी केली आहे. एका समाजासाठी इतरांवर अन्याय नको, असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
ठाकरे सरकार म्हणजे बोलीचा भात आणि बोलाची कडी… नुस्तं बोलबच्चन- निलेश राणे
…मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे दुःख वेगळे आहे का?; विश्वजित कदम यांचा केंद्र सरकारला सवाल
Pub-G आजपासून पूर्णपणे बंद; मोबाईलमध्ये गेम चालणार नाही
अकरावी प्रवेश लवकरच; राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरू होणार- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड