सांगली : कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने 1 मे पासून सर्वांना लसीकरण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र राज्य सरकारने राज्यात लसीकरण सुरु करण्यासाठी पुरेशा लसी उपलब्ध होणार नाहीत, असं म्हटलं. त्यामुळे राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबणीवर पडणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं होतं. यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली.
1 तारखेपासून आम्ही 18 ते 44 वयोगटातील लोकांचे लसीकरण करणार आहोत, असं आरोग्यमंत्र्यांनी घोषित केलं. नंतर 4 वाजता सांगितलं की, ते करता येणार नाही. म्हणजे हे लोक पुरते गोंधळलेले आहेत. सकाळी जी पत्रकार परिषद घेतली होती, ती गांजा ओढून घेतली होती का?, असा प्रश्न गोपीचंद पडळकरांनी यावेळी उपस्थित केला.
दरम्यान, राज्य सरकारला उठ सूट केंद्राकडे बोट दाखवायचं आहे. तसेच मुळात विचारसरणी एक नसताना ते एकत्र आले असून भाजपला विरोधी करण्यासाठी हे एकत्र आले असल्याचं म्हणत पडळकरांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ते सांगलीमध्ये माध्यमांशी बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ; अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
“पंकजाताई होणाऱ्या त्रासाची मला जाणीव, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे”; धनंजय मुंडेची फेसबुक पोस्ट