पीडित महिलेची तक्रार हा राठोडांना टीआरपीचा विषय वाटतो का?; चित्रा वाघ कडाडल्या

0
321

मुंबई : शिवसेना नेते संजय राठोड यांच्या विरोधात आणखी एका महिलेने तक्रार केली आहे. संजय राठोड यांनी माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली आहे, अशी लिखित तक्रार या महिलेने केली. यावर संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली.

माझा राजकीय प्रवास संपवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. तसेच संजय नावाच्या साधर्म्यामुळे हा घोळ झाला असल्याचा दावा संजय राठोड यांनी यावेळी केला. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत संजय राठोड यांच्यावर हल्लाबोल केला.

यवतमाळ येथील तरुणीने गंभीर आरोप केले आहेत. पोलीस अधिक्षकांकडे या महिलेने पोस्टाने तक्रार केली आहे. शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांच्यावर हे आरोप करण्यात आले आहेत. यवतमाळच्या एसपींनीही तक्रार आल्याचं मान्य केलं आहे. पण महिलेची तक्रार येऊनही तिचा अजून जबाब नोंदवण्यात आला नाही. तिला कोणी विचारणाही केली नाही., असं चित्रा वाघ म्हणाल्या.

दरम्यान, संजय राठोड यांनी पतीला नोकरीवर कायम ठेवण्यासाठी शरीरसुखाची मागणी करत शारीरिक, मानसिक छळ केल्याचे पीडित महिलेनं तक्रारीत म्हटलंय. तर माजी मंत्र्याला अशा न्यूज म्हणजे टीआरपीची न्यूज वाटते. राठोड यांचं विधान धक्कादायक आहे. ही कसली मग्रुरी आहे. हा सत्तेचा माज आहे, असा घणाघात चित्रा वाघ यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

“महाराष्ट्राला अजून शिवाजी महाराज कळालेच नाहीत”

“चिक्की प्रकरणाशी पंकजा मुंडेंचा संबंध जोडणं म्हणजे, शिळ्या कढीला ऊत आणण्याचं काम”

“अभिनेत्री राधिका आपटेचा ‘तो’ न्यूड फोटो सोशल मिडियावर व्हायरल, नेटकरी म्हणाले…;

दादर, माहीमच काय नितेश राणेंना कोकणातही जिंकू देणार नाही; शिवसेनेचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here