कोल्हापूर : परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मत व्यक्त केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि माझ्याविषयी कोणीही काहीही बोलतो. आम्हाला कसलीही टोपण नावं ठेवली जातात. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
गोपीचंद पडळकर एक समजूतदार कार्यकर्ता आहेत. त्यांचे शब्द चुकले, पण शरद पवार यांच्याबद्दल त्यांच्या मनात आदर आहे. राजकारणात निश्चितपणे शब्द जपून वापरले पाहिजेत. अन्यथा त्याची जखम खूप दिवस राहते. गोपीचंद पडळकर चुकला म्हणून इतरांनी काहीही बोलू नये. कोणी काहीही बोलले तरी चालते का ? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला.
दरम्यान, तुम्ही अग्रलेखामध्ये काय लिहिता? त्यातली तुमची भाषा कसली आहे?,” असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं.
महत्वाच्या घडामोडी-
“व्हिएतनाम येथे अडकलेल्या तरूणाच्या मदतीसाठी धावले खासदार धैर्यशील माने”
“पडळकरांचं जेवढं वय नाही तेवढं पवारसाहेबांचं काम”- रोहित पवार
“शरद पवारांवरील विधानानंतर पडळकरांविरोधात पहिला गुन्हा दाखल”
‘ही’ भाजपची परंपरा नाही; पडळकरांनी केलेल्या टीकेवर भातखळकरांच वक्तव्य