नवी दिल्ली : योगगुरू बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान असून रेमडेसिविर, फॅव्हिफ्लू यांसह औषध महानियंत्रकांनी मान्यता दिलेली अनेक औषधं कोरोनावर उपचार करण्यात अपयशी ठरली आहेत, असं रामदेव बाबा म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर देशभरातून त्यांच्यावर संताप व्यक्त केला गेला. यावर आता फेडरेशन ऑफ रेजिडेंट डॉक्टर्स असोसिएशन इंडिया (फोर्डा)ने उद्या मंगळवारी दि.1 जून रोजी देशभर काळा दिवस पाळणार असल्याचं जाहीर केलं आहे.
देशातील रेजिडेंट डॉक्टर्स असोसिएशनचे सर्व डॉक्टर उद्या 1 जून रोजी काळा दिवस पाळणार आहेत. उद्या सर्व डॉक्टर रामदेवबाबांचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून काम करणार आहेत. तसेच व्हॉट्सअॅपवरील डीपीही ब्लॅक ठेवणार आहेत, असं फोर्डाचे अध्यक्ष डॉ. मनिष यांनी सांगितलं.
दरम्यान, उद्या कोरोना ड्युटीवर असेलेले सर्व डॉक्टर, नर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ पीपीई किटवर काळी पट्टी लावून काम करतील.
महत्वाच्या घडामोडी –
अनिल परब यांच्यासाठी वेगळे नियम का?; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
राज्यात 15 जूनपर्यंत निर्बंध कायम- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
देशातील जनतेला कोरोनाच्या खाईत लोटणा-या मोदींनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा- नाना पटोले
काँग्रेसच्या काळात महागाईवर आंदोलन करणारे आता कुठं लपलेत?- बाळासाहेब थोरात