आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
डोंबिवली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत गुरुवारी दुपारच्या सुमारास मोठा स्फोट झाल्याची घटना घडली. याघटनेला शिंदे सरकार जबादार असल्याचा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला होता.
डोंबिवलीतील संपूर्ण औद्योगिक क्षेत्र दुसऱ्या जागेवर हलवणे शक्य नाही. मात्र, ज्या पाच केमिकल कंपन्या इथे आहेत, त्या इथून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येईल, असा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. मात्र, दुर्देवाने आमचं सरकार गेलं आणि गद्दारांचे सरकार आलं. या सरकारने या निर्णयावर पुढे काहीही केलं नाही. यावर कोणतीही पावले उचललेली नाहीत. या सरकारकडून अनाधिकृत उद्योगांना पाठिशी घालण्याचं काम सुरू आहे”, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली.
ही बातमी पण वाचा : पुणे अपघातावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘कितीही श्रीमंताच्या बापाचा..’
ज्याप्रमाणे राज्यात बॉयलर विषय धोरण आहे. त्याप्रणाने रिअॅक्टर विषयी धोरण असणे आवश्यक आहे. हे रिअॅक्टर का फुटतात, कारण हे जुने रिअॅक्टर असतात, हे रिअॅक्टर महाग आहेत. छोट्या कंपन्यांना हे खरेदी करणं अवघड जातं. त्यामुळे मोठ्या कंपन्यांनी डिसमेंटलेले रिएक्टर छोट्या कंपन्या विकत घेतात”, असंही अंबादास दानवे म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘…तर भाजप सत्तेतून बाजूला जाईल’- जयंत पाटील
मोठी बातमी! गजानन कीर्तिकर यांच्या हकालपट्टीची मागणीला भाजपचा पाठिंबा!
“…अन् राज ठाकरे माध्यमांवर भडकले; नेमकं कारण काय, वाचा सविस्तर”