जगभरात अनेक खेळाडू असे आहेत, ज्यांनी 2 देशांकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले आहे. मात्र जगभरात असा केवळ एकच क्रिकेटपटू आहे ज्याने भारत आणि इंग्लंड संघांकडून कसोटी क्रिकेट खेळले आहे. या क्रिकेटपटूचे नाव इफ्तिखार अली खान असे असून, त्यांना ‘नवाब पतौडी’ या नावाने ओळखले जाते. आज (16 मार्च) त्यांचा 111वा वाढदिवस आहे.
2 डिसेंबर 1932 रोजी सिडनी येथे इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सामन्यातून त्यांनी कसोटीत पदार्पण केले होते. यावेळी पहिल्याच सामन्यात त्यांनी दमदार शतक ठोकले होते. त्यानंतर कसोटी मालिकेच्या उर्वरित सामन्यांमध्ये ते इंग्लंडच्या धोरणांशी असहमत असल्याने त्यांना संघात स्थान देण्यात आले नव्हते. पुढे त्यांनी 1934 पर्यंत इंग्लंड संघाकडून 2 कसोटी सामने खेळले. यावेळी त्यांनी 5 डावात 28.8च्या सरासरीने 144 धावा केल्या होत्या.
पतौडींचा मुलगा मंसूर अली खान हा भारताचा माजी कर्णधार होता. पतौडी यांना फटकेबाज खेळाडू म्हणून ओळखले जात होते. त्यांनी लॉर्ड्समध्ये नाबाद 231 धावांचा विक्रम केला होता.
महत्वाच्या घडामोडी –
“राजस्थान हादरलं! एका अल्पवयीन मुलीवर सलग 9 दिवस 18 जणांनी केला बलात्कार”
सचिन वाझे प्रकरणी ज्यांच्यापर्यंत धागेदोरे जातील त्यांच्यावर कारवाई होणार – अजित पवार
“शरद पवारांनीच अनिल देशमुखांना तात्काळ घरी पाठवावं”