Home महाराष्ट्र लोकांनी आयुष्यभर बुस्टर डोस घेत रहायचं का?; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा राज्य सरकारला...

लोकांनी आयुष्यभर बुस्टर डोस घेत रहायचं का?; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा राज्य सरकारला घरचा आहेर

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : करोना विषाणू संसर्गावर सध्या एकमेव प्रभावी उपाय म्हणून लसीकरणाचा पर्याय सांगितला जात आहे. त्यामुळेच आता पहिल्या दोन डोसनंतर आता भारतातही परदेशाप्रमाणे तिसऱ्या बुस्टर डोसला सुरूवात झालीय. मात्र, यावरूनच काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी राज्यातील ठाकरे सरकारला घरचा आहेर दिलाय.

हे ही वाचा : भाजपच्या नेत्यांना लागलेली ‘ही’ सवय लवकर जाईल; रोहित पवारांचा टोला

आता उपाययोजना करणं हा विषय राहिलेला नाही. मागील 2 वर्षांपासून आपण फक्त उपाययोजना-उपाययोजना म्हणतो आहे. कोविडवर अचूक असं कोणतं औषध आहे? ओमायक्रॉनवर कोणतं औषधं आहे? तुमच्या प्रयोगशाळा काय करत आहेत? केंद्र सरकारच्या प्रयोगशाळा काय करत आहेत? राज्य सरकारच्या प्रयोगशाळा काय करत आहेत? आजही आपण दुसऱ्या देशाने पाठवलेल्या लसींवर बोलतो आहे, असं बाळू धानोरकर म्हणाले आहेत.

आपण परदेशात पाहतो की तीनदा लस घेतली, चारदा लस घेतली. फक्त लस हा विषय नाही. लस दिली म्हणजे त्या विषाणूवर नियंत्रण आलं का? लस घेतल्यावर विषाणूवर किती दिवस नियंत्रण असेल यावर आजही केंद्र आणि राज्य सरकार बोलत नाही, लोकांनी आयुष्यभर बुस्टर डोस घेत रहायचं का? असा सवालही बाळू धानोरकर यांनी यावेळी केला आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

…याला म्हणतात कॅप्टन्सी; विराट कोहलीनं शमीमध्ये जोश भरला आणि त्यानंतर शमीनं असं काही केलं की…

“मुख्यमंत्री ऑन फिल्डच, ज्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधलीये त्याला काय करावं”

“मुख्यमंत्री ऑन फिल्डच, ज्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधलीये त्याला काय करावं”