मुंबई : शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. त्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील पडळकरांना प्रत्युत्तर दिलं आहे.
राजकारणात नेम आणि फेम मिळवायचे असले की शरद पवार साहेबांवर टीका करायची हे समजून अनेकजण उचलली जीभ लावली टाळ्याला या उचापती करतात, असं धनंजय मुंडे म्हणाले.
सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न न करता डिपॉझिट, अस्तित्व टिकून राहील, देवांच्या खोट्या शपथा घ्याव्या लागणार नाही, हे पहावे. बिरोबा यांना सद्बुद्धी देवो!, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी गोपीचंद पडळकरांना उत्तर दिलं आहे.
राजकारणात नेम आणि फेम मिळवायचे असले की @PawarSpeaks साहेबांवर टीका करायची हे समजून अनेकजण उचलली जीभ लावली टाळ्याला या उचापती करतात. सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न न करता डिपॉझिट, अस्तित्व टिकून राहील, देवांच्या खोट्या शपथा घ्याव्या लागणार नाही, हे पहावे. बिरोबा यांना सद्बुद्धी देवो!
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) June 24, 2020
महत्वाच्या घडामोडी-
शरद पवार हे राजकीय विरोधक आहेत शत्रू नाहीत; पडळकरांच्या टीकेवर फडणवीसांचं भाष्य
“गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचं उद्या पुण्यात आंदोलन”
“शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना”- गोपीचंद पडळकर
राज ठाकरेंसोबत जाण्याची आमची इच्छा होती पण…; देवेंद्र फडणवीसांच वक्तव्य