Home महाराष्ट्र घाईघाईने निर्बंध शिथिल करु नका; मुख्यमंत्र्यांच्या सूचना; ‘या’ 7 जिल्ह्यांना अधिक काळजी...

घाईघाईने निर्बंध शिथिल करु नका; मुख्यमंत्र्यांच्या सूचना; ‘या’ 7 जिल्ह्यांना अधिक काळजी घेण्याचं आवाहन

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट अजून गेलेली नाही आणि त्यातून सावरून आपल्याला तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करायचा आहे. अशातच डेल्टा प्लस या नव्या विषाणूमुळे संकट घोंगावू लागलंय. त्यामुळे राज्यात पुन्हा कडक निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीनं सरकारी स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच घाईनं निर्बंध शिथिल करु नका, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

कोरोना संसर्ग वेगाने वाढत असलेल्या 7 जिल्ह्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. या 7 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी आज व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

दरम्यान, कोरोना आणि डेल्टा प्लस या विषाणूंचा धोका लक्षात ठेवून, संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पुढील काळात किती जास्तीचे ऑक्सिजन आणि आयसीयू बेड्स लागतील तसेच फिल्ट रूग्णालयासारख्या किती सुविधा उभाराव्या लागतील याविषयी आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना नियोजन करून द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी दिले.

महत्वाच्या घडामोडी –

” ही महाविकास आघाडी नव्हे, ही तर ‘महाविनाश’ आघाडी”

तुमच्यात हिंमत नसेल तर आम्हांला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो- देवेंद्र फडणवीस

“भाजपला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला?

काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह शेवट पर्यंत टिकेल असं वाटत नाही- जयंत पाटील