गृहखातं राष्ट्रवादीला देऊ नका नाहीतर… चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला प्रेमाचा सल्ला

0
329

रत्नागिरी : गृहमंत्रिपद तरी राष्ट्रवादीला देऊ नका, नाहीतर ‘मातोश्री’वर सीसीटीव्ही कॅमेरे लागतील, असा प्रेमाचा सल्ला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला. रत्नागिरीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गृहमंत्रिपद राष्ट्रवादीला देऊ नका. तुम्ही काहीच ठेवत नाही हातामध्ये. गृहमंत्र्यांकडे सगळं असतं. तुम्ही सगळंच देऊन टाकलं गृहमंत्रिपद राष्ट्रवादीला दिलंत, तर मातोश्रीवर कॅमेरे लागतील. आपण खूप वर्ष एकत्र काम केलं आहे, त्यामुळे तुम्हाला प्रेमाचा सल्ला देतोय, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

तुम्ही अर्थ देऊन टाकलं, महसूल दिलं, सार्वजनिक बांधकाम दिलं, मग ठेवलं काय? फक्त मुख्यमंत्रिपद? बाकी तुमच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं?’ असा प्रश्नही चंद्रकांत पाटीलांनी यावेळी विचारला.

दरम्यान, जर गृहखातं राष्ट्रवादी काँग्रेसकडं गेलं तरी ते अजित पवारांकडे जाण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे शरद पवार जयंत पाटील किंवा दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपद जाण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या घडामोडी-

-भारताशी युद्ध करण्यासाठी आमचं सैन्य तयार- इम्रान खान

-भाजपच्या ‘या’ नेत्याने घेतली राज ठाकरेंची भेट; भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण

-दिल्लीत बसलेला तो शेंबडा मुलगा गतीमंद आहे- शरद पोंक्षे

-प्रकाश आंबेकडर यांना मुंबई पोलिसांची नोटीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here