मुंबई : राज्यात पुढील 2 ते 3 दिवस पुरेल इतकाच कोरोना लसीचा साठा शिल्लक असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं होतं. यावरून भाजप नेत्यांनी सरकारवर हल्लाबोल केला होता. आता यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत भाजप नेत्यांना चांगलंच सुनावलं आहे.
किमान संकट काळात तरी राजकारण करू नका. सरकार पडणार नाहीच पण ते पडावं यासाठी आपण जेवढे शर्थीचे प्रयत्न करत आहात, तेवढं राज्याच्या हितासाठी करा, असं आवाहन रोहित पवारांनी यावेळी केलं.
लस वितरण लोकसंख्येच्या आधारावर होत नसूनही विरोधक महाराष्ट्राची तुलना उत्तर प्रदेशशी करत आहेत. महाराष्ट्राला 1.06 कोटी डोस मिळाले. आज आपल्याकडे 10 लाख डोस शिल्लक असून ते परवापर्यंत संपेल. केंद्र सरकारच्या गृहितकानुसार वेस्ट रेट हा 10% असू शकतो,पण आपण तो अवघा 3% ठेवला. राज्यातील रुग्णसंख्या बघता लस पुरवठा किती व्हावा, याचा विरोधकांनी विचार करावा, असा टोला रोहित पवारांनी यावेळी लगावला.
केंद्र सरकारने महाराष्ट्राला किती आणि कशी मदत केली, हे सांगायची आता वेळ नाही. योग्य वेळी ते जनतेला नक्की कळेल. सध्या राज्याला संकटातून बाहेर काढायची वेळ आहे. त्यासाठी विरोधी पक्षाचे नेते नक्कीच हातभार लावतील, असंही रोहित पवार यावेळी म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले…
“दादा मास्क काढा” भाषणादरम्यान अजित पवारांना चिठ्ठी; त्यावर अजित पवार म्हणतात…
कोणत्या जिल्ह्यात लसींचा साठा सर्वाधिक आहे, हे फडणवीसांनी दाखवून द्यावं- जयंत पाटील
“मुळात राज्य सरकार आपली जबाबदारी पूर्ण करत नाही”