Home महाराष्ट्र राजकीय कार्यकर्त्यांना ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमू नका; फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

राजकीय कार्यकर्त्यांना ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमू नका; फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : राजकीय कार्यकर्त्यांना ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नेमू नका, अशी विनंती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

राज्यातील मुदत संपत असलेल्या सुमारे 14 हजार ग्रामपंचायतींवर पालकमंत्र्यांच्या सल्लामसलतीने प्रशासक नेमण्याचे अधिकार संबंधित जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यासंबंधीचा शासन आगेश पूर्णपणे राजकीय हेतून प्रेरित आहे, असा आरोप फडणवीस यांनी पत्रात केला आहे. कोरोना संकटाच्या काळात आपली राजकीय पोळी शेकून घेण्याचा हा प्रकार आहे, असा घणाघात फडणवीसांनी केला आहे.

लोकशाही परंपरा पायदडी तुडविण्याचा हा प्रकार सर्वथा अनुचित आहे. राजकीय पक्षांनी आता प्रशासक नियुक्तीसाठी दुकानदारीला सुरुवात केली आहे. या निर्णयाविरोधात अखिल भारतीय सरपंच परिषदेनेसुद्धा नाराजी नोंदविली आहे. त्यांनी न्यायालयात या निर्णयाला आव्हान देण्याचे ठरविले आहे, असं फडणवीस यांनी या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, निवडणुका हा आपल्या देशातील लोकशाहीचा आत्मा आहे. अशापद्धतीने तो नष्ट करण्याचा अधिकार कुणालाही नाही, असंही फडणवीसांनी पत्रात म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी

बारामतीकरांसाठी शरद पवार ठरले देवदूत; कोरोना रुग्णांसाठी केली ‘ही’ मोठी मदत

जुलै महिन्याच्या अखेरीस कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणार?; मुख्यमंत्री म्हणतात…

अजित पवारांच्या ‘बारामती पॅटर्न’ ला तडा; उद्या मध्यरात्रीपासून कडकडीत लॉकडाऊन