आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहेत. शरद पवार यांनी पिंपरी-चिंचवडल दोनवेळा भेट दिल्याने पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. आता पिंपरीपाठोपाठ शरद पवार यांनी पुण्यात लक्ष घातलं आहे.
हे ही वाचा : काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ आमदाराचा भाजपात प्रवेश
पुण्यात राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी विशेष लक्ष घालणार असून दिवाळीच्या एक दोन दिवसानंतर आजी-माजी नगरसेवक तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत ते बैठक घेणार आहेत. या बैठकीत भाजपमध्ये गेलेले पुण्यातील नगरसेवक जवळपास 18 ते 19 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतणार आहेत. याबाबतचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज केला.
दरम्यान, भाजपात गेलेले नगरसेवकांचा पक्षात भ्रमनिरास झाला आहे. त्यांना सापत्नक वागणूक दिली जात आहे. भाजपच्या जुन्या नगरसेवकांना अधिक महत्त्व दिले जात आहे. निधी वाटपात दुजाभाव केला जात असल्याने या नगरसेवकांमध्ये कमालीची नाराजी आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले जवळपास 18 ते 19 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतणार आहे, अशी माहिती प्रशांत जगताप यांनी दिली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
कोणीही पक्ष सोडून गेला तरी, राष्ट्रवादीचा पराभव होणे अशक्य- जयंत पाटील
पिंपरी – चिंचवडमध्ये भाजपला मोठा धक्का मिळणार! सात नगरसेवक ‘या’ पक्षाच्या संपर्कात
किरीट सोमय्या 26 ऑक्टोबरला नांदेड दौऱ्यावर, सचिन सावंत म्हणतात…