Pune News : गोपाळकृष्ण विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप

0
2

पुणे : विघ्नहर्ता मोबाईल शॉपीचे संस्थापक अमित शिंदे यांनी त्यांच्या मातोश्री अरुणा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गोखलेनगर येथील गोपाळकृष्ण प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत विविध शैक्षणिक वस्तूंचे वाटप केले. वाढदिवसाचा होणारा खर्च टाळून सदर खर्चातून प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि पॅड आदी शैक्षणिक वस्तूंचे वाटप अरुणा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर शैक्षणिक वस्तूंकरिता पाठपुरावा प्रशालेतील उपक्रमशील शिक्षक रणजित बोत्रे यांनी केला. नव्या शैक्षणिक वर्षाची चाहूल आता लागली आहे. त्यामुळे पालकांची शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची लगबग सुरू झाली आहे. प्रशालेतील विद्यार्थ्यांची गरज ओळखून विघ्नहर्ता मोबाईल शॉपी यांच्या वतीने देऊ केलेल्या शैक्षणिक मदतीबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री कासार यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली गावडे यांनी केले.

यावेळी विघ्नहर्ता मोबाईल शॉपीचे संस्थापक अमित शिंदे, मातोश्री अरुणा शिंदे, मुख्याध्यापिका जयश्री कासार, मंदाकिनी बलकवडे, दिपाली गावडे, रणजित बोत्रे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here