भाजप-शिंदे गटात वादाची ठिणगी; ‘या’ भाजप नेत्याची मुख्यंत्र्यांवर टीका

0
462

वाशिम : भाजप आणि शिंदे गट यांच्यामध्ये मोठी ठिणगी पडली आहे. राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात काल शिंदे गटाने वर्तमानपत्रांमध्ये दिली होती. या जाहिरातीतील मजकूर भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

शिंदे गटाने दिलेल्या या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना करण्यात आली आहे. तसेच एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. बाकी कोणी नाही, असंही या जाहिरातीतून अप्रत्यक्षपणे सूचवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्वही एकप्रकारे नाकारण्यात आलं आहे. त्यामुळे भाजप खासदार अनिल बोंडे यांनी थेट आणि उघडपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर उघडपणे टीका केली आहे.

ही बातमी पण वाचा : भाजप मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आम्ही…; नाना पटोलेंचा इशारा

बेडूक किती फुकला तरी हत्ती बनत नाही, अशा शब्दात अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सर्व्हेच्या जाहिरातीवर कडवट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

दरम्यान, शिंदे यांना ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र वाटायला लागलाय, असा हल्लाबोलही अनिल बोंडे यांनी यावेळी केला आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री हरवले आहेत; मनसेचा आक्रमक पवित्रा

मला पक्षातून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी…; नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट

…यांचा दिल्लीत जाऊन करेक्ट कार्यक्रम करणार; खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here