मंत्रिमंडळाचा विस्ताराआधी राष्ट्रवादीमध्ये नाराजीनाट्य; ‘या’ आमदाराचे कार्यकर्ते देणार राजिनामे

0
562

मुंबई : आज 30 डिसेंबर या दिवशी महाविकास आघाडीच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मात्र, या आधीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य सुरु झालं आहे.

आमदार मकरंद पाटील यांना मंत्रीमंडळ विस्तारातून डावल्यामुळे वाई, खंडाळा आणि महाबळेश्वरमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुर उमटला आहे. त्यामुळे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांसह याठिकाणचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आपल्या पदांचा राजीनामा देण्याच्या तयारीत आसल्याची माहिती समोर आली आहे.

सोमवारी राष्ट्रवादीचे सर्व समर्थक आत्मक्लेश आंदोलन करणार आहेत. यावेळी लोणंद ,वाई, महाबळेश्वर नगरपालिकेच्या नगरसेवकांसह आठ जिल्हा परिषद सदस्य आपल्या पदांचा राजीनामा देणार असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, आज काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे 36 आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या घडामोडी-

-…म्हणून रायगड जिल्ह्यात शेती शिल्लक राहणार नाही- शरद पवार

-अमृता फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला, म्हणतात…

-सत्तांतर झालं असलं तरी शिवसेना आणि भाजपचं रक्त एक आहे- चंद्रकांत पाटील

-उद्धव ठाकरे हे केवळ नामधारी मुख्यमंत्री- नारायण राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here