मुंबई : काँग्रेसला सरकारच्या निर्णय प्रक्रियेत स्थान मिळायला पाहिजे. ही गोष्ट आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालू, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आज दुपारी 1.30 वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
दरम्यान,काँग्रेस नेत्यांची स्वतंत्र बैठकही झाली होती. या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस नेते आपली बाजू मुख्यमंत्र्यांकडे मांडतील, अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिली होती.
महत्वाच्या घडामोडी-
मोदीजी सर्जिकल स्ट्राइक करा; माझ्या शहीद पतीचे बलिदान व्यर्थ जायला नको
भारतीय कंपनीला डावलून चिनी कंपनीला दिलेलं कॉन्ट्रॅक्ट रद्द करा- जितेंद्र आव्हाड
सुशांत तू खूप लवकर निघून गेलास; शेन वॉटसनही गहिवरला