“जळगावमध्ये गुलाबराव पाटील गिरीश महाजनांच्या घरी, शिवसेना-भाजप युतीच्या चर्चांना उधाण”

0
459

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : राज्यात नुकतीच नगरपंचायत निवडणुक पार पडली. यात जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायत निवडणुकीची राज्यात सर्वाधिक चर्चा रंगली.

नगरपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाअगोदर जळगावचे पालकमंत्री व शिवसेना नेते गुलाबराव पाटील आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यात भेट होऊन चर्चा झाल्यानं चर्चांना उधाण आलं असतानाच आता पुन्हा एकदा गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्या भेटीनं चर्चांना उधाण आलं आहे.

हे ही वाचा : टिपू सुलतान नावाच्या वादावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले….

गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांनी एकाच गाडीमध्ये बसत चर्चा केली. बोदवड नगरपंचायत निकालावरून भाजप-शिवसेना युतीची चर्चा रंगत असताना दोन्ही नेते एकाच गाडीमध्ये चर्चा करत असल्याचं दिसून आलं आहे. जामनेरमध्ये एक कार्यक्रम आटपून गिरीश महाजन यांच्या घरी गुलाबराव पाटील गेले. यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी गुलाबराव पाटलांचा सत्कार केला. यामुळे भाजप-सेना युतीवरून चर्चांना उधाण आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

लवकरच सांगली जिल्ह्यातील काही माजी आमदार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार; जयंत पटलांचं मोठं वक्तव्य

तुम्ही काय फक्त खुर्चीवर बसण्यासाठी आहात का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

टिपू सुलतान नावाला भाजपचा जोरदार विरोध; अस्लम शेख म्हणतात, भाजप नेत्यांनी..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here