Home देश बोम्मईंच्या ट्विटबाबत अमित शहांशी चर्चा; बैठकीत नेमकं काय घडलं; मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्टच...

बोम्मईंच्या ट्विटबाबत अमित शहांशी चर्चा; बैठकीत नेमकं काय घडलं; मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. कन्नड रक्षण वेदिका संघटनेने केलेल्या या राड्यानंतर महाराष्ट्रातही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

याच पार्श्वभूमीवर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मी, देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि त्यांचे गृहमंत्री या बैठकीला उपस्थित होते. दोन राज्यांमध्ये काही घटना होत होत्या. महाराष्ट्राच्या जनतेला त्रास होऊ नये, अशी राज्य सरकारची भूमिका होती. चर्चेत दोन्ही राज्यात शांततेचं आणि सौहाद्राच्या सूचना दोन्ही राज्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्या., अशी माहिती एकनाथ शिंदेंनी यावेळी माध्यमांना बोलताना दिली.

हे ही वाचा : पुण्यातील बंद बेकायदेशीर, खासदार उदयनराजे भोसलेंना अटक करा; अॅड. गुणरत्न सदावर्तेंची मागणी

दोन्ही राज्यातील तीन-तीन मंत्र्यांची समिती गठित होईल. मराठी भाषा, मराठी माणसं, मराठी लोकांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, अशी भूमिका मांडलेली आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण आहे. याचा कुठंही अवमान होऊ नये, अशी भूमिका अमित शहांनी घेतली असल्याचं एकनाथ शिंदेंनी यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

शिंदे-फडणवीसांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान, म्हणाले, आता उद्धव ठाकरेंनी ठरवावं की…

“‘राज’ सरकार!; राज ठाकरेंनी केली मध्यस्थी, अन् ‘त्या’ पोलिसांचे निलंबन मागे”

मातोश्रीचा सोंगाड्या, जो सकाळी भगवा, दुपारी हिरवा आणि रात्री…; मनसेचा सुषमा अंधारेंवर पलटवार