कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रावर ओढावलेली महापूराची भीषण परिस्थितीमुळे अनेकजण अद्याप त्यातून सावरलेले नाहीत. त्यामुळे अनेक स्तरांमधून अतिवृष्टीचा फटका बसलेल्या ठिकाणी मदत पोहोचवली जात आहे. अशातच कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार मदतीसाठी पूरग्रस्त भागात आहेत.
आमदार रोहित पवार कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या भेटीसाठी गेले असता त्यांच्यासमोर तिथल्या आर्थिक अडचणीत असलेल्या एका महिलेने ‘कुटुंबातील व्यक्ती आजारी असून पैसे नसल्याने पुढचे उपचार कसे करायचे, गरिबानं कुठं जायचं?, अशी व्यथा मांडली. यानंतर आमदार रोहित पवार यांनी तात्काळ संबंधित हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांना फोन करून त्या रुग्णाचे मोफत उपचाराची सोय करून दिली.
दरम्यान, रोहित पवार यांच्या या कार्यतत्परतेमुळे सर्वसामन्यांच्या समस्या सोडविणाऱ्या त्यांचे कौतुक केलं जात आहे. आमदार रोहित पवार यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे पूरस्थितीने बाधित असलेल्या एका महिलेचे आर्थिक संकट दूर झाले.
महत्वाच्या घडामोडी –
….त्यासाठी लवकरच राज ठाकरेंच्या भेटीला जाणार आहे- चंद्रकांत पाटील
मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांसाठी पॅकेज घोषित केलं तर खरं, मात्र…; आशिष शेलारांचा घणाघात
‘फटे लेकीन हटे नही’, सोनियासेनेच्या प्रवक्त्यांना बीफचंही समर्थन करावं लागतंय- चित्रा वाघ
लग्नानंतरही त्याचे अनेक महिलांशी शारीरिक संबंध होते; यो यो हनी सिंगच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा