मोठी बातमी! बीडच्या घटनेत थेट नेत्यांचा हात?; फडणवीसांचा खळबळजनक दावा

0
210

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई | मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण प्रचंड तापलं आहे. आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलनादरम्यान बीडमध्ये अघटित घटना घडल्या. आमदारांच्या घरांची जाळपोळ करण्यात आली तसेच कार्यालयं देखील जाळण्यात आली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.

हिंसाचारामागे काही पक्षाचे नेते तसेच कार्यकर्ते असल्याचा खळबळजनक दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

ही बातमी पण वाचा : पुण्यातील नवले ब्रीजवर आंदोलकांचं टायर जाळून रस्ता रोको

बीडमध्ये जो प्रकार घडला त्याचे सारे व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. 50-55 लोकांची ओळख पटली आहे, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. मात्र या घटना घडत असताना काही राजकीय पक्षांचे नेते तसेच कार्यकर्ते त्यात सहभागी होते. पोलिसांकडे त्याचे व्हिडीओ आहेत, मात्र तपासणीनंतर खात्री होईल, त्यानंतर त्यासंदर्भात अधिक माहिती देवू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

मराठा आंदोलनाला हिंसक वळण; माजलगाव नगरपरिषद फोडली

मोठी बातमी! शिंदे गटाच्या खासदारानंतर आता अजित पवार गटातील ‘हा’ आमदार देणार राजीनामा?

जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा – देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here