मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मातोश्री निवासस्थान उडवून देण्याची धमकी दाऊद इब्राहिमच्या हस्तकानं केल्याची माहिती समोर आली आहे. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शेवटी महाराष्ट्राच्या जनतेची मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी थेट दुबईवरून फोन आला. डायरेक्ट दाऊदची धमकी आली. आता तरी घरातून बाहेर निघा. मुख्यमंत्री साहेब!!,” अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
दरम्यान, नितेश राणे यांच्याबरोबर निलेश राणे यांनीही ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
शेवटी..
महाराष्ट्र च्या जनतेची मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी थेट दुबई वरून फोन आला..डायरेक्ट दाऊद ची धमकी आली..
आता तरी घरातून बाहेर निघा..मुख्यमंत्री साहेब!!
— nitesh rane (@NiteshNRane) September 6, 2020
महत्वाच्या घडामोडी-
माझी ताकत काय आहे ते 105 आमदार असूनही विरोधी पक्षांमध्ये बसलेल्यांना विचारा- संजय राऊत
दाऊद म्हणत असेल हाच मुख्यमंत्री पाहिजे; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला
“मुख्यमंत्र्यांना धमकीचा फोन; मातोश्री उडवून देण्याची दिली धमकी”
घाबरु नका, कोरोना संपल्यावर आपलीच सत्ता येईल; रावसाहेब दानवे पाटलांचं वक्तव्य