मुंबई : महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे असतील. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे महाराष्ट्राच्या गृहविभागाचा कारभार सोपवण्यात आला आहे.
1990 ला दिलीप वळसे पाटील हे पहिल्यांदाच काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते, यानंतर 7 वेळेस ते आंबेगाव मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले, म्हणून आंबेगावात दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रीपद मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करण्यात येत आहे. तसेच दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांच्या विश्वासू व्यक्तींपैकी एक मानले जातात.
दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार असल्याने अखेर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या पदी दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा का देत नाही?; नारायण राणेंचा सवाल
“सरकारला आणखी अनेक राजीनामे घ्यावे लागतील म्हणजे ‘दुरुस्त आये ‘ म्हणणे शक्य तरी होईल”
आता नवा वसूली मंत्री कोण?; अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर चित्रा वाघ यांचा सवाल
गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले…