आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : पश्चिम बंगालच्या मुंख्यमंत्री ममता बॅनर्जी महाराष्ट्रातील उद्योग पळवून नेण्यासाठी तर आल्या नाहीत ना? असा सवाल करत भाजप नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकार आणि ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला होता. त्याला आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी पलटवार केला आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत आले आहेत. व्हायब्रंट गुजरातसाठी ते रोड शो करत आहेत. भाजपला हे चालतं का? असा प्रतिसवाल संजय राऊत यांनी आशिष शेलार यांना केला आहे. संजय राऊत यांनी आज मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला आहे.
हे ही वाचा : “आगामी निवडणुकीतही काँग्रेसला 300 जागा मिळणार नाहीत; ‘या’ मोठ्या नेत्याचा पक्षाला घरचा आहेर”
भाजपच्या आरोप-प्रत्यारोपाला काही अर्थ नाही. हा पोटशूळ आहे. विरोधकांच्या पोटात दुखू लागलं आहे. ममता बॅनर्जी आल्या. उद्योगपतींना भेटल्या. मुंबई औद्योगिक नगरी आहे. या उद्योगपतींचे देशभरात उद्योग आहेत. ते सगळीकडे उद्योग करतात. ममतांनी म्हटलं कोलकात्यातही लक्ष द्या. त्यात चुकलं काय? असं संजय राऊत यांनी म्हटलं.
दरम्यान, ममता बॅनर्जी या काय मुंबई लुटायला, ओरबडायला आल्या आहेत का? ममता बॅनर्जी मुंबई लुटायला आल्या असं जे म्हणत आहेत ते मूर्ख लोकं आहेत. माझा प्रश्न आहे की आज गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे अर्ध मंत्रिमंडळ घेऊन मुंबईत आले. व्हाटब्रंट गुजरातसाठी ते मुंबईत आले. व्हायब्रंट गुजरात तिकडे. मुंबईत काय कशासाठी? व्हायब्रंट गुजरातसाठी मुंबईत रोड शो करता, उद्योगपतींना आकर्षित करता ते चालतं का? यालाच मी लूट म्हणतो, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
भाजपला आरोप करू द्या. त्यांना आरोपांचे जुलाब होत आहेत. त्यांना आरोपांचा डायरीया झाला आहे. त्यांना तोंडाचा डायरीया झाला आहे. दुर्गंधी काही काळ निर्माण करतात. त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, अशी खोचक टीकाही संजय राऊत यांनी यावेळी केली.
महत्वाच्या घडामोडी –
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अखेर रूग्णालयातून डिस्चार्ज; रूग्णालयातून ‘वर्षा’वर
“कोल्हापूरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं दु:खद निधन”
“मोठी बातमी! उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात”