Home महाराष्ट्र …तेंव्हा गडकरींना शिवसेना कशी काम करते माहीत नव्हतं का?; नाना पटोलेंचा सवाल

…तेंव्हा गडकरींना शिवसेना कशी काम करते माहीत नव्हतं का?; नाना पटोलेंचा सवाल

नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाशिम जिल्ह्यातील रस्ते कामात होत असलेल्या अडवणुकीबाबत एक पत्र लिहिलं आहे. शिवसेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधींकडून होत असलेल्या अडवणुकीबद्दलचं पत्र गडकरींनी लिहिलं आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली.

महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गांचं काम व्हायला पाहिजे. जे लोक याला विरोध करतात, काम बंद पाडतात, त्यांचं समर्थन काँग्रेस करत नाही. रस्ते व्हावे या बाजूने काँग्रेस आहे. पण 25 वर्षे शिवसेना आणि भाजप एकत्र होती. तेव्हा गडकरींना शिवसेना कशी काम करते, हे माहिती नव्हतं का? आता कुणाच्या इशाऱ्याने गडकरींनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे? असा सवाल नाना पटोले यांनी यावेळा केला.

दरम्यान, महामार्गाच्या कामात मोठा भ्रष्टाचार होतोय. त्यामुळे त्याची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणीही नाना पटोले यांनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

शिवसेना-भाजप युती संदर्भात संजय राऊतांशी चर्चा; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाला सुरुंग लागण्याची चिन्हे ; 30 नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर?

राज्यपालांवर दबाव, त्यांनी प्यादं बनू नये- संजय राऊत

काम करणारे पुढे या, मिरवणाऱ्यांनो बाजूला व्हा; फोटोसाठी पुढे पुढे करणाऱ्यांना अजित पवारांनी खडसावलं