Home महाराष्ट्र तुम्ही काय फक्त कपडे बदलून फेसबुक लाईव्ह करायला मुख्यमंत्री झालात का?; गोपीचंद...

तुम्ही काय फक्त कपडे बदलून फेसबुक लाईव्ह करायला मुख्यमंत्री झालात का?; गोपीचंद पडळकरांचा सवाल

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातल्या जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. ज्यात त्यांनी, आज मी पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतो आहे, पण लॉकडाऊन लागू करत नाहीये. पण दोन दिवसांत मला दृश्य स्वरूपात फरक दिसला नाही, आणि ज्यांच्याशी मी बोलतोय, त्यांच्याकडून वेगळा पर्याय दिसला नाही, तर जगात ज्या प्रमाणे लॉकडाऊनचे टप्पे जाहीर केले जातात, तसे करावे लागतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? लॉकडाऊन हा पर्याय नाही, लॅाकडाऊन शिवाय कोरोना नियंत्रणात येईल. पण दरवेळेला जनतेला गृहीत धरुन मनमानी कारभार रेटायचा बंद करा. बरं यातही सगळं लोकांनीच करावं, जनतेनं रोखावं किंवा जबाबदारीनं वागावं, तर मग तुम्ही काय फक्त कपडे बदलून फेसबुक लाइव्ह करायला मुख्यमंत्री झालात का? जनतेला रस्त्यावर उतरून दाखवा म्हणणाऱ्यांनी आधी खुर्चीवरून उतरून दाखवावं, असा टोला पडळकरांनी यावेळी लगावला.

दरम्यान, काल रात्रीचं फेसबुक लाईव्ह नेमकं कशासाठी होतं? मुख्यमंत्र्यांनी वारंवार लॉकडाऊन आणि बेरोजगारी या दोन गोष्टींचा उल्लेख लाईव्हमध्ये केला हे दुर्दैवी आहे. यानं सामान्य जनतेत काय संदेश जातोय? आता जनतेच्या मनात दहशत निर्माण करण्याचं काम सरकारनं करु नये. इथे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला आहे आणि तुम्ही लॉकडाऊन- लॉकडाऊन हा काय खेळ लावलाय? वर्षभरात काय केलं तुम्ही?, असा प्रश्नही पडळकरांनी यावेळी उपस्थित केला.

महत्वाच्या घडामोडी –

मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण कशासाठी होतं? तेच कळलं नाही; देवेंद्र फडणवीसांचा टोला

“अर्थमंत्री मॅडम, एवढा मोठा निर्णय ही नजरचूक कशी असू शकते?”

लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांच मोठ वक्तव्य; म्हणाले…

“भाजपच्या ‘या’ नेत्याने केला शिवसेनेत प्रवेश”