Home महाराष्ट्र शिवार’ खरंच जलयुक्त झाले की फक्त पाण्याऐवजी पैसेच मुरले?- रोहित पवार

शिवार’ खरंच जलयुक्त झाले की फक्त पाण्याऐवजी पैसेच मुरले?- रोहित पवार

मुंबई : फडणवीस सरकारच्या काळातील महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश निघाले. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधलाय.

या योजनेमुळे ‘शिवार’ खरंच जलयुक्त झाले की फक्त पाण्याऐवजी पैसेच मुरले?, हे आता स्पष्ट होईल, असं म्हणत रोहित पवार यांनी भाजपला टोला लगावला आहे.

ग्रामीण भागासाठी क्रांतिकारी योजना असल्याचा मागील भाजप सरकारने गाजावाजा केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा फुगा कॅगच्या अहवालाने फुटला. तब्बल 9633 कोटी ₹ खर्चूनही भूजलपातळीत वाढ झाली नसेल तर हे पैसे कुठं मुरले व कुणाची पातळी उंचावली याचा तपास झाला पाहिजे, असं रोहित पवार म्हणाले.

दरम्यान, जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केलंय.

महत्वाच्या घडामोडी-

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत खुली चौकशी होणार

“आम्ही तोंड उघडलं तर तुम्हाला तोंड लपवायला जागा ठेवणार नाही”

दिल्ली कॅपिटल्सचा आणखी एक विजय; राजस्थानवर 13 धावांनी मात

शिखर धवन व श्रेयस अय्यरची शानदार अर्धशतके; दिल्लीचे राजस्थानसमोर 162 धावांचे लक्ष्य