धनंजय मुंडेेंसोबतच्या नात्यासंबंधीचा उलगडा पुस्तकातून करणार; करूणा मुंडेंची पोस्ट चर्चेत

0
871

बीड : बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत मोठी घोषणा केली आहे. करुणा धनंजय मुंडे यांनी आपल्या जीवनावर आधारीत पुस्तक प्रकाशन करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे आता पुन्हा करुणा मुंडे आणि धनजंय मुंडे यांच्या नात्यासंबंधीच्या चर्चेला उधाण आले आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर खासगी आयुष्याबद्दल खुलासा करण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियातूनच खुलासा करत, तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा हिच्याशी आपला काहीएक संबंध नाही. तिची मोठी बहीण करुण शर्मा हिच्याशी परस्पर सहमतीनं मी संबंध ठेवले होते. तिच्यापासून मला दोन मुलं आहेत, अशी कबुली दिली होती. यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.

दरम्यान, यानंतर करूणा मुंडे यांनी पुस्तक प्रकाशित करणार असल्याचं जाहीर केल्याचं सांगितल्यानं या चर्चांना उधाण आलं आहे. माझ्या जीवनावर आधारित सत्य प्रेम जीवनगाथा लवकर प्रकाशन प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. त्याचे प्रकाशन लवकर केले जाणार आहे, असं म्हणत करुणा धनंजय मुंडे यांनी सोबत फोटो शेअर केला आहे. यामध्ये एक प्रेमकथा लवकरच असा उल्लेख असून खाली आश्चर्यजनक प्रेमकथा असंही लिहिण्यात आलेलं दिसत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण”

…तर मुंबईकरांना अजून 15 दिवसांची शिक्षा कशासाठी?; नितेश राणेंचा ठाकरे सरकारला सवाल

“27 जून रोजी होणारी UPSC ची परीक्षा रद्द; नवीन तारीख जाहीर”

“सोशल मिडियासाठी 6 कोटी खर्च करण्याचा अजित पवारांचा निर्णय रद्द”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here