Home बीड आता बळीचं राज्य आलं, शेतकरी कर्जमुक्ती योजनेवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

आता बळीचं राज्य आलं, शेतकरी कर्जमुक्ती योजनेवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

बीड : महाविकासआघाडी सरकारच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या 15 हजार लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली. यावर बळीचं राज्य आलं, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या 15 हजार लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली एप्रिल अखेरपर्यंत टप्प्याटप्प्यानं याद्या जाहीर होऊन सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल. जिल्हा पातळीवर अंमलबजावणीचं काम सुरू झालं आहे. बळीचं राज्य आलं, असं ट्वीट करत म्हणत धनंजय मुंडेंनी योजनेचे स्वागत केलं.

 जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत बीड जिल्ह्यातील 700 शेतकऱ्यांचे नाव समाविष्ट आहे. त्यामुळे कायम दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आमच्या भागातील शेतकऱ्याला या कर्जमाफीमुळे नक्कीच दिलासा मिळेल, असंही धनंजय मुंडे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

देवेंद्रजी, विरोधी पक्षनेते म्हणून कामाला लागा; शिवसेनेचा देवेंद्र फडणवीसांना सल्ला

आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही…तुम्हीही लग्नाला या; शेतकऱ्याचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना अमंत्रण

डोनाल्ड ट्रम्प जर मुंबईला आले असते तर त्यांनी आधी शिवथाळी चाखली असती- संजय राऊत

ठाकरे सरकारकडून कौतुक करावं असं काम झालेलं नाही- पंकजा मुंडे