धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार; करुणा शर्मा पत्रकार परिषद घेत करणार मोठा खुलासा

0
382

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा शर्मा पुन्हा एकदा मोठा गौप्यस्फोट करण्याच्या तयारीत आहे. करुणा शर्मा यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. करुणा शर्मा या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेणार आहेत.

मी लवकरच अहमदनगरमध्ये पत्रकार परिषद घेणार असून यात मी सगळे खुलासे करणार आहे. तसेच या पत्रकार परिषदेत माझी मुलं सुद्धा माझ्यासोबत असतील आणि ते स्वतः त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल सांगतील, असं करुणा शर्मा म्हणाल्या आहेत.

हे ही वाचा : मनसेचं लक्ष्य पुणे महापालिकेवर; राज ठाकरे पुणे दौरा, उद्या निवडणुकीची आखणार रणनीती

करुणा यांच्या या भूमिकेमुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं दिसतय. करुणा यांच्या घोषणेनंतर पुन्हा कोणता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, यापूर्वी धनंजय मुंडे यांच्याविरोधात सप्टेंबर महिन्यात पत्रकार परिषदेतून भांडाफोड करणार असल्याचा खुलासा त्यांनी केला होता. मात्र त्याचवेळी त्यांच्या गाडीत पिस्तुल सापडल्यामुळे शर्मा यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे शर्मा यांची पत्रकार परिषद घेता आली नाही.

महत्वाच्या घडामोडी –

मनसेचं लक्ष्य पुणे महापालिकेवर; राज ठाकरे पुणे दौरा, उद्या निवडणुकीची आखणार रणनीती

…त्यामुळे ममता बॅनर्जी कधी रंग बदलतील, पुन्हा मोदींबरोबर जातील काही सांगता येत नाही”

तरूणींना इम्प्रेस करण्यासाठी स्टंटबाजी करणाऱ्या तरूणाची झाली चांगलीच फजिती; पहा व्हिडिओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here