मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. रेणू शर्मा यांच्यानंतर आता धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा शर्मा यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे धनंजय मुंडेंविरोधात तक्रार दाखल केली आहे.
गेल्या 3 महिन्यापासून धनंजय मुंडे यांनी त्यांच्या दोन मुलांना चित्रकूट बंगल्यात डांबून ठेवल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे. यावर स्वत: धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
करूणा शर्मा यांच्या बाबतीत मी यापूर्वीच खुलासा केला आहे. करूणा शर्मा यांना न्यायिक प्रक्रियेत काहीही रस नसून माझी निव्वळ मीडिया ट्रायल चालवून बदनामी करणं हाच हेतू दिसतोय, असं धनंजय मुंडे म्हणाले.
दरम्यान, ही बाब न्यायप्रवीष्ठ असून न्यायालयीन प्रक्रियेअंतर्गत जो निर्णय होईल तो बंधनकारकच असणार आहे. तसेच माझ्यावर करूणा शर्मा यांनी केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
धनंजय मुंडे काय पराक्रमी योद्धा आहे का?; तृप्ती देसाईंचा सवाल
“मला कोणी खलनायक ठरविलं तरी चालेल पण मी कोणतेही निर्णय घाईघाईने घेणार नाही”
पक्ष वाढवायचा असेल तर…; जयंत पाटलांच कार्यकर्त्यांना आवाहन
धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत; रेणू शर्मांनंतर आता करुणा शर्मांची मुंबई पोलीस आयुक्तांकडेतक्रार